पिंपरी : साहित्य घरपोच करण्यासाठी (डिलिव्हरी) गृहनिर्माण सोसायटीमध्ये गेल्यानंतर पाळत ठेवून सायकली चोरून ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देऊन विक्री करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली.राहुल रविंद्र पवार (वय २५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत संदीप दिगंबर तांबे (वय ४३, रा.रहाटनी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी राहुल हा साहित्य घरपोच करण्याचे काम करतो. साहित्य देण्याच्या बहाण्याने तो सोसायटीमध्ये जायचा आणि सायकलीवर पाळत ठेवत होता. वेळ मिळाल्यानंतर तो सायकली चोरत होता. ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देवून लोकांना विकत होता. आरोपी राहुल चोरीची सायकल विकण्यासाठी तापकीर मळा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wakad police arrested a delivery boy who stole bicycles and sold them on olx app pune print ggy 03 amy
First published on: 31-05-2023 at 02:20 IST