पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घेतला असून पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागा मार्फत कळविण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागा मार्फत २३ मे रोजी शहरातील विविध पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामाकरीता गुरुवारी २६ मे रोजी शहराचा दिवसभराकरिता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच दरम्यान दुसर्‍या दिवशी म्हणजे २७ मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे एका कार्यक्रमाकरिता येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सर्व ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची नोंद शहरातील नागरिकांनी घ्यावी,असे आवाहन महापालिका प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to pune city will continue on thursday abn 97 svk
First published on: 25-05-2022 at 17:04 IST