वारजे जलकेंद्र अखत्यारित गांधी भवन टाकी आणि चांदणी चौक टाकी परिसर, वारजे, एसएनडीटी टाकी, नवीन आणि जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग, कोंढवे-धावडे जलकेंद्रासह जुने होळकर जलकेंद्र येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची कामे येत्या गुरुवारी (१ डिसेंबर) करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारीही शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२ डिसेंबर) सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा- पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे-

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॅलनी, सिल्पा फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू, गार्डन सिटी, पाॅप्युलर काॅलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य काॅलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी परिसर, सहजानंद, शांतिबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन ७ आणि ९, मुंबई पुणे बाह्यवळण दोन्ही बाजू, शेरवाती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हाॅस्पिटल सोसायटी, हिंगणे होम काॅलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, पाषाण भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरजनगर, सागर काॅलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म.

हेही वाचा- संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार

शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅइंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू काॅलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका, कर्वेनगर गल्ली क्रमांक १ ते १०, गोखलेनगर, शिवाजीनगर, माॅडेल, काॅलनी, रेव्हेन्यू काॅलनी, संपूर्ण कोथरूड, वडारवस्ती, स्टेट बँक काॅलनी, श्रमिक वसाहत, हॅपी काॅलनी, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, रामबाग काॅलनी, हनुमाननगरग, केळेवाडी, गुजरात काॅलनी, गाढवे काॅलनी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे.