पुणे : राज्यात घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आलेले सरकार हे स्थगिती सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेल्या सर्व विकास प्रक्रियेला थांबवण्याचे काम या मंडळींनी केले आहे. गुजरातचे महत्व वाढवत महाराष्ट्राचे सातत्याने खच्चीकरण करणारी ही मंडळी असून, या सरकारला ज्या प्रकारे मुंबई महापालिकेचे विशेष लेखापरीक्षण करावेसे वाटते तसे नागपूर, पुणे महापालिकेचे का करावेसे वाटत नाही, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी गुरुवार पेठेत झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या  डॉ नीलम गोऱ्हे, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  राजेंद्र गवई, माजी मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी आमदार मोहन जोशी,शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन खरकुडे आदी या वेळी उपस्थित होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चव्हाण म्हणाले, की ‘ही नुसतीच पोटनिवडणूक नसून ही विचारांची निवडणूक असल्याने ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी नीती असणाऱ्या राज्यकर्त्यांना कसब्याची जनता धडा शिकवेल.’