क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी नागपूर येथे आढावा बैठक घेतली. भिडेवाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन करण्याच्या कालमर्यादेत काम करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पुणे : सांडपाणी रस्त्यावर आल्याने खड्डे पडले; सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांची माहिती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषणही केले होते. भुजबळ यांच्या मुद्द्यावर निवेदन करताना स्मारकाबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली. इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते. तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> पुणे: खडकवासला धरणात तरुण आणि तरुणीचा तरंगताना आढळला मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे, त्यात काय काय असावे या बाबत सूचना भुजबळ यांनी केल्या. सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला प्राधान्य सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घेऊन आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.