पिंपरी चिंचवड मधील चिखली येथे ‘तामिळनाडू प्रिमीअर लीग’ क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यासह पाच जणांना निगडी पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. या कारवाईत २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. पोलिसांना चिखली येथील मित्तल इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, मोबाईल, रोख ५३ हजार ५०० रुपयांसह एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईमध्ये जावेद रमजान शेख (वय ४७, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) नवीन भगवान मित्तल (वय ४३, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय ३७, रा. बालाजीनगर, धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय ३६, रा. दत्तवाडी, आकुर्डी) आणि जाकीर मस्तान शेख (वय २९, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहे.

[jwplayer qSkEaoqJ]

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With ncp corporater five people arrested during batting of cricket league at pimpri chinchwad
First published on: 09-08-2017 at 14:43 IST