scorecardresearch

पुणे : गॅस सिलिंडरमधून गळती स्फोटात महिला जखमी ; नऱ्हे भागातील घटना

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

पुणे : गॅस सिलिंडरमधून गळती स्फोटात महिला जखमी ; नऱ्हे भागातील घटना
( संग्रहित छायचित्र )

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत महिला होरपळली असून तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.नऱ्हे गावातील भैरवनाथ मंदिराजवळ बैठ्या घरात मंगळवारी सकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उमराटकर, पांडुरंग तांबे, संतोष चौरे, नितीन मोकाशी, सतीश डाखवे, संजू चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> घरासमोर शेण पडल्यावरुन दोन गटात हाणामारी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जवानांनी गॅस गळती रोखली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहचेपर्यंत स्फोटात जखमी झालेल्या महिलेला पतीने तातडीने रुग्णालयात दाखल केले.जवानांनी गॅस गळती रोखून आग आटोक्यात आणली. जवानांनी घरातील दोन रिकामे सिलिंडर तातडीने बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 15:21 IST

संबंधित बातम्या