पुणे : कोंढवा भागात झालेल्या एका महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. खून झालेल्या महिलेने आरोपींकडे दारू मागितल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी जैद आसिफ शेख (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे दरम्यान आहे. तिची ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असावी, असा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा – पुणे: अतिसूक्ष्म उद्योगांत सर्वाधिक व्यवहार रोखीनेच; गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

कोंढव्यातील मेफेअर एलिगंझा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत एका झाडाखाली एक महिला मृतावस्थेत सापडली होती. तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नव्हती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक, तसेच कोंढवा पोलिसांच्या पथकाकडून तपास करण्यात येत होता.

आरोपी जैद आणि त्याचा साथीदार मेफेअर एलिगंझा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत दारू प्यायला बसले होते, अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. संशयित आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यानंतर जैद आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. रविवारी (१ जानेवारी) रात्री दोघेजण मोकळ्या जागेत दारू प्यायला बसले होते. त्या वेळी एक महिला तिथे आली. तिने पिण्यासाठी दारू मागितली. तिने वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा जैद आणि अल्पवयीन साथीदाराने तिच्या डोक्यात दगड मारल्याचे चाैकशीत उघड झाले.

हेही वाचा – पुणे: पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमाेल झेंडे, रंजन शर्मा, सहायक आयुक्त विक्रांत देशमुख, पौर्णिमा तावरे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women murder for asking liquor in kondhwa two arrested pune print news rbk 25 ssb
First published on: 04-01-2023 at 10:16 IST