लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांसह चौघींना डांबून ठेवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आखाती देशात सफाई काम करणाऱ्या महिलांची दलालांनी चार लाख रुपयांत विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Illegal occupation of Lalit High School ground in Dombivli by locals case filed against fourteen people
डोंबिवलीतील ललित हायस्कूलच्या मैदानाचा स्थानिकांकडून बेकायदा ताबा, चौदा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता

याप्रकरणी दलाल नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान, हकीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दोन महिलांनी फिर्याद दिली असून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-तेरा जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती; नगर, सांगली, सातारा, जालना, बीडमध्ये टंचाईच्या तीव्र झळा

तक्रारदार महिला मार्केट यार्ड भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत राहायला आहे. चंदननगर भागातील एका महिलेने आखाती देशात सफाई कामाची नोकरी आहे. दरमहा ३५ ते ४० हजार रुपये वेतन मिळेल, असे महिलांना सांगितले होते. तक्रारदार महिलांनी मुंबईतील दलाल नसरीन भाभी, अब्दुल शेख, शमीमा खान, हकीम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सौदी अरेबियातील रियाध शहरातील एका अरबी व्यक्तीकडे त्यांना साफसफाईचे काम मिळवून दिले होते. पुण्यातील तीन महिला अरबी व्यक्तीकडे काम करत होत्या.

आणखी वाचा-एटीएसची मोठी कारवाई : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक

अरबी व्यक्तीने त्यांचा छळ सुरू केला. त्यांना वेळेवर जेवण दिले जात नव्हते. रात्री काम करायला सांगितले जात होते. विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जात होती. दलालांनी महिलांची सौदी अरेबियातील व्यक्तीला चार लाख रुपयांत विक्री केली होती. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक केली. महिलांनी दलालांशी संपर्क साधला. तेव्हा चार लाख रुपये द्यावे लागतील, असे दलालांनी सांगितले होते. अखेर महिलांनी समाजमाध्यमातून राज्य महिला आयोगाचा संपर्क क्रमांक मिळविला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांनी पुन्हा मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सौदी अरेबिया, भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महिलांना मायदेशी आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर महिलांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पुण्यातील तीन महिलांसह चेन्नईमधील एका महिलेला परत आणण्यात यश आले.

फसवणूक प्रकरणी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.