देशभरात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. पण दुसऱ्या बाजुला महिलांवर अन्याय-अत्याचार होतात. हे योग्य नसून राज्यात आजही स्त्री-भ्रूण हत्या होत आहेत. ही निंदनीय बाब आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी वाडेश्वर कट्ट्यावर बोलताना व्यक्त केले.

जागतिक महिला दिनी देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक संघटना त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. पुणे शहरानेही नेहमीप्रमाणे आपले वेगळेपण जपले आहे. पुण्यात दर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या माध्यमातून वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. त्यात विविध क्षेत्रांतील मंडळी एकत्रित येतात आणि मसाला डोसा, इडली सांबर, चहा घेत विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारतात. आजही अशाच वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन वाडेश्वर कट्ट्यावर केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, नगरसेविका मुक्ता टिळक, उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार, पुणे महापालिका लेखापाल उल्का कळसकर, वाहतूक पोलीस अधिकारी कल्पना बारवकर या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

महिला दिन एका दिवसासाठी साजरा न करता वर्षाचे ३६५ दिवस साजरा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातील स्त्रीयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. २१ व्या शतकातही महिलांना स्वतःला सिध्द करावे लागत आहे, अशी खंत उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार यांनी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक महिलेने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. राजकीय जीवनात काम करताना अनेक अनुभव येतात. त्यामध्ये प्रामुख्याने घर आणि समाजतील प्रश्न सोडवताना कसरत करावी लागते. येत्या काळात समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणार असून प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढे येऊन काम करण्याची गरज आहे, असे नगरसेविका मुक्ता टिळक म्हणाल्या. घरातील हिशेब मांडताना कसरत करावी लागते. तसेच महापलिकेत लेखापाल म्हणून काम करताना कसरत करावी लागते, असे महापालिका लेखापाल उल्का कळसकर म्हणाल्या. प्रशाकीय सेवेत महिला मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. ही चांगली बाब आहे. यापुढील काळातही महिलांनी प्रशाकीय सेवेत येणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.