देशभरात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. पण दुसऱ्या बाजुला महिलांवर अन्याय-अत्याचार होतात. हे योग्य नसून राज्यात आजही स्त्री-भ्रूण हत्या होत आहेत. ही निंदनीय बाब आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी वाडेश्वर कट्ट्यावर बोलताना व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक महिला दिनी देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक संघटना त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. पुणे शहरानेही नेहमीप्रमाणे आपले वेगळेपण जपले आहे. पुण्यात दर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या माध्यमातून वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. त्यात विविध क्षेत्रांतील मंडळी एकत्रित येतात आणि मसाला डोसा, इडली सांबर, चहा घेत विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारतात. आजही अशाच वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन वाडेश्वर कट्ट्यावर केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, नगरसेविका मुक्ता टिळक, उपजिल्हाधिकारी सुप्रिया दातार, पुणे महापालिका लेखापाल उल्का कळसकर, वाहतूक पोलीस अधिकारी कल्पना बारवकर या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens day 2017 pune wadeshwar katta ncp mp supriya sule all party katta at wadeshwar
First published on: 08-03-2017 at 14:24 IST