चोरीचा खोटा आरोप झाल्याने रुबी हॉल क्लिनिकमधील मोहन सोनवणे (वय ३५, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) या वॉर्डबॉयने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. मोहन यांच्यावर ४ ऑगस्ट रोजी कॅथलॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्या ड्रॉवरमधून दोन लाख रुपये चोरल्याचा आरोप केला होता. काही दिवसांनी कुचिक यांना हे पैसे टेबलखाली मिळाले होते. मात्र, तरीही मोहनला अपमानास्पद वागणूक देणे सुरूच होते. हा चोरीचा खोटा आळ आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक याला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. सोनवणे यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या सर्वाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी त्यांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय संघटनांनी ठिय्या आंदोलन करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
युवतीचा कात्रज जंगलात मृतदेह
कात्रज जुन्या घाटाच्या बाजूला जंगलात २७ वर्षीय अज्ञात युवतीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा नॉयलॉनच्या दोरीने आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केला असण्याची शक्यता आहे. जंगलात सुरक्षारक्षक गस्त घालत असताना मृतदेह आढळून आला.
दोन गावठी कट्टे जप्त
विमानतळ पोलिसांनी सोमवारी िरकी सुखदेव सिंग धारिवाल (वय २६, रा. नागपूर चाळ, जेलरोड पोलीस चौकीसमोर, येवरडा) याच्याकडून दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word boy suicide due to stole allegation
First published on: 26-08-2015 at 08:56 IST