“कष्टकऱ्यांनी संघर्ष करून बांधकाम मजुरांसाठी कायदा करणे सरकारला भाग पाडले. मात्र, या कायद्यात बांधकाम मजुरांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे,” असा गंभीर आरोप कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना कामगारांचे प्रश्न, तक्रारी ऐकण्यासाठी वेळ नाही, अशी तक्रारही कांबळे यांनी केली. ते पिंपरी चिंचवडमधील वाकड भुमकर चौकात आयोजित असंघटित कामगार मेळाव्यात बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले, “असंघटित कामगारांमध्ये बांधकाम मजुरांची संख्या मोठी आहे. २००७ मध्ये आम्ही संघर्ष करून बांधकाम मजुरांसाठी कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. सध्या या कायद्याचा गैरवापर सुरू आहे.”

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

“कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना तक्रारी ऐकण्यासाठी वेळच नाही”

“दररोज बांधकाम मजुरांचे अपघात होत आहेत. मालक, बांधकाम व्यावसायिकांना मोकळे सोडले जाते. छोट्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले जातात. प्रत्येक बांधकाम प्रकल्पावर मजुरांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील तक्रारी ऐकण्यासाठी वेळच नाही,” असा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

हेही वाचा : …तर किरीट सोमय्या यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : हसन मुश्रीफ

यावेळी राजू साव, मुकेश ठाकूर, दिनेश यादव, महेंद्र जाधव, शिवाजी गोरे, मधुरा डांगे, सुषमा बाळसराफ आदी उपस्थित होते.