लोणावळ्या जवळील टायगर पाईंट येथील घुबड तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धवल विजयभाई परमार असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धवल परमार (वय २४,रा.कादंबरी विशाल हॉटेल समोर अंधेरी कुर्ला रोड,इस्ट मुंबई) आणि त्याचा एक मित्र तसेच तीन मैत्रिणी या टायगर पॉईंट येथील घुबड तलावाच्या धबधब्याचा खाली भिजण्याचा आनंद घेत होते. दंगा मस्ती सुरू असताना अचानक धवल परमार याचा पाय घसरला आणि तो थेट खड्ड्यात जाऊन पडला. त्याचा मित्र आणि मैत्रिणी मदत करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे शेजारील पर्यटक धावून आले मात्र खड्डा खोल असल्यामुळे ते कोणतीही मदत करु शकले नाही. पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेनंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कू टीमने आणि पोलिसांना बोलावण्यात आले. शिवदुर्ग रेस्कू टीमने  तलावातून धवलचा मृतदेह शोधून बाहेर काढला. धवल याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth died due to drowning in lake at lonavlas tiger point
First published on: 20-07-2017 at 16:05 IST