Prawn Bhaji Recipe: आपण आतापर्यंत अनेकदा कोळंबीचा रस्सा, कोळंबी फ्राय, कोळंबी मसाला अशा विविध रेसिपी केल्या असतील. पण, आज आम्ही तुम्हाला कोळंबी भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. चला तर जाणून घेऊया कोळंबी भजीची साहित्य आणि कृती…

कोळंबी भजी बनवण्यासाठी साहित्य :

१. २ वाटी सोललेली कोळंबी
२. ३ कांदे बारीक चिरलेले
३. पाव चमचा हळद
४. आलं-लसूण पेस्ट
५. १ चमचा लाल तिखट
६. २ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
७. मीठ चवीनुसार
८. तेल आवश्यकतेनुसार

कोळंबी भजी बनवण्याची कृती :

हेही वाचा: सफरचंद खायचा कंटाळा येतो? मग बनवा पौष्टिक सफरचंद हलवा; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी कोळंबी स्वच्छ धुऊन घ्या, जर कोळंबी मोठी असेल त्याचे तुकडे करा.

२. त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद लावून काही वेळ झाकून ठेवा.

३. काही वेळानंतर त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि बेसन पीठ मिक्स करावे.

४. किंचित पाणी ओतून भज्याचे पीठ नीट मिक्स करा.

५. आता गरम तेलामध्ये कोळंबी भजी सोडा आणि छान फ्राय करून घ्या.

६. तयार गरमा-गरम कोळंबी भजी सर्व्ह करा.