Malvani Masala Pav Bhaji Recipe : प्रत्येकाची आवडती व्हेजी, रिच आणि मसालेदार पावभाजी ही एक स्वादिष्ट आणि सोपी लोकप्रिय डिश आहे. ज्यामध्ये मिश्र भाज्या, विविध मसाले घालून शिजवल्या जातात. पावभाजी ही अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते पण बऱ्याचदा आपण बाहेर जशी पाव भाजी खातो तशी घरी बनवायला गेलो तर त्या पावभाजीला चव येत नाही. पण आता तुम्ही घरच्या घरी हॉटेलसारखी चव चाखू शकता, आज आम्ही तुमच्यासाठी मालवणी मसाला घालून पावभाजीची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात कशी बनवायची.. अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, नेहमी तुम्ही अशीच पावभाजी बनवाल .

मालवणी मसाला पावभाजी साहित्य

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”

३ गाजर
१ कप मटर
४ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेली सिमला मिरची
१ कप फुलकोबीचे तुकडे
५ मोठे टोमॅटो
४ मोठे बटाटे
१ बीटरूट
३ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून जीरे
मुठभर कोथिंबीर
२ चमचे आले लसूण पेस्ट
६ चमचे पाव भाजी मसाला
चवीनुसार मीठ
३ टीस्पून लाल मिर्च पावडर
१ टीस्पून मालवणी मसाला
२ टीस्पून काश्मिरीलाल मिर्च पावडर
२ टीस्पून कसुरी मेथी
४ चमचे लोणी
तेल

मालवणी मसाला पावभाजी कृती

१. सर्वात आधी एका कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये जीरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पावभाजी मसाला परतून घ्या. शिमला मिरची सोडून इतर सर्व भाज्या बारीक कापून त्यामध्ये टाकून दोन-तीन मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यावे. त्यामध्ये एक चमचा हळद, एक चमचा मीठ तसेच दोन कप पाणी घालून कुकर बंद करून कूकरच्या तीन शिट्ट्या करुन घ्याव्यात.

२. सर्वप्रथम कढईमध्ये थोडेसे तेल घाला कारण त्याने बटर करपत नाही. तेल गरम झाले की त्यामध्ये बटर घालावे नंतर त्यामध्ये बारीक किसलेला कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला की आले-लसूण पेस्ट आणि बारिक किसलेली शिमला मिरची घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, १ टीस्पून मालवणी मसाला आणि पावभाजी मसाला घालावा. ते परतले की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून मऊ होऊ द्या.

३. कुकरमध्ये शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घ्याव्यात. स्मॅश केलेल्या भाज्या कढईमध्ये घालून सर्व भाजी नीट मिक्स करून घ्यावी. त्यामध्ये पाणी घालून परत एकदा स्मॅश करून घ्यावे. त्यामध्ये कोथिंबीर लिंबाचा रस घालून सर्वात शेवटी पावभाजीला बटरी चव येण्यासाठी त्यामध्ये एक मोठा चमचा भरुन बटर घालावे ते भाजीत मिक्स करून घ्यावे.

४. भाजी शिजेपर्यंत लादी पाव किवां ब्रेडला बटर लावून भाजून घ्या आणि मग आता तुमची मुंबई स्पेशल पाव भाजी तयार आहे. पाव भाजीवर बटर घालून व मस्त बारीक कापलेले कांदे, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि आवडत असल्यास चीज किसून सर्व्ह करा व आनंद घ्या.

हेही वाचा >> शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही; एकदा खाल तर खातच रहाल, लगेच नोट करा रेसिपी

५. पाव गरम करून सर्व्ह करा. मालवणी मसाला घालून पाव भाजी.चवीला खूप छान लागते.