दसरा म्हंटलं की प्रत्येकाच्याच घरी गोडाधोडाचे पदार्थ हे बनवले जातात. पण प्रत्येक सणाला काय वेगळा पदार्थ बनवायचा असा प्रश्न पडतो, तर आता जास्त विचार करु नका आज बनवा जिभेवर रेंगाळणारा खमंग बेळगावी कुंदा रेसिपी. चला तर जाणून घेऊया याची खास सोपी मराठी रेसिपी.

बेळगावचा कुंदा साहित्य

  • १ लिटर दूध
  • १ वाटी साखर
  • १ वाटी दही

बेळगावचा कुंदा कृती

स्टेप १
एका भांड्यात दूध घेऊन ते गरम करायला ठेवा..१५ मिनिटे दूध आटवून घ्या…

स्टेप २
अटवलेल्या दुधात दही घाला व सतत हलवत राहा,ते दूध फुटायला लागेल,दूध फुटलं की ते पाणी काढून टाका…पाणी ठेवलं तरी चालत पण पाणी अटेपर्यं खूप वेळ लागतो..मी पाणी काढून टाकलं..

हेही वाचा >> “चटपटीत खानदेशी कढी” कमी साहित्याची महाराष्ट्रीयन दही कढी नक्की ट्राय करा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ३
त्यात अर्धी वाटी साखर घालून हलवत राहा..दुसऱ्या भांड्यात उरलेली साखर घालून गॅस वर ठेऊन त्याच कॅरॅमल तयार करून घ्या…ते कॅरॅमल दुधात घाला व ५ ते ७ मिनिटे शिजवुन घ्या..पूर्ण पाणी अटल की कुंदा तयार…