Tasty Chaha Tips : चहा आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आपण चहापासून करतो.अनेक जण दिवसातून दोन तीन वेळा चहा घेतात. काही लोकांना टपरीवरचा चहा प्यायला खूप आवडतो. असं म्हणतात की टपरीवरचा चहा अधिक स्वादिष्ट असतो पण तुम्ही सुद्धा घरच्या घरी स्वादिष्ट चहा बनवू शकता.काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही चहाचा स्वाद वाढवू शकता.

साहित्य

  • पाणी
  • वेलची
  • आलं
  • लवंग
  • चहापत्ती
  • साखर
  • दूध
  • दालचिनी
  • वेलची पावडर

हेही वाचा : VIDEO : वृ्द्ध काकांचा ‘सुपरमॅन’ अवतार! केला मनसोक्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात गरम पाणी करा
  • गरम पाण्यात बारीक वाटलेले आलं आणि वेलची आणि लवंग टाका.
  • त्यानंतर हे सर्व कमी आचेवर त्यात उकळू द्या.
  • त्यानंतर चहापत्ती आणि साखर टाका
  • चहा चांगला उकळू द्या
  • त्यानंतर त्यात दूध टाका आणि चहाला चांगली उकळी येऊ द्या
  • तुमचा चहा तयार होणार.

टिप्स :

१. वेलची, आलं आणि लवंग सुरुवातीला गरम पाण्यात उकळणे गरजेचे आहे. यामुळे चहाला चांगला स्वाद येतो.
२. फ्रिजमधील थंड दूध फ्रिजमध्ये लगेच टाकू नका.थंड दुधामुळे चहाचा स्वाद बिघडू शकतो.
३.चहा बनल्यानंतर त्यावर वेलची पावडर आणि दालचिनी पावडर टाकल्यामुळे सुद्धा चहाचा स्वाद वाढतो.