दिवाळीनंतर भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज हे भाऊ आणि बहिणीतील अतूट नात्याला अजून सुरक्षित करणारे सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्याच्या उज्जवल भविष्यासाठी पूजा करते. या दिवशी भाऊ बहीण दोन्ही एकमेकांना भेटवस्तू देतात, गोड भरवतात. चला तर यंदाच्या भाऊबीजेला भावाचे तोंड गोड करण्यासाठी बनवा ‘केशरी भात’या रेसिपीनं तुमची भाऊबीज होईल एकदम खास. चला तर पाहुयात रेसिपी..

गोड केशरी भात साहित्य –

  • १ कप तांदूळ, २.५ कप पाणी
  • १ चमचे खाद्यतेल रंग
  • १ कप साखर, २ चमचे तूप
  • आवश्यकतेनुसार तेजपत्ता, केशर
  • दालचिनीची काडी, पिस्ता, काजू, बदाम
  • हिरवी वेलची, लवंग
  • १ कप नारळ

गोड केशरी भात कृती –

तांदूळ स्वच्छ धुवून १ तास भिजत ठेवा. कुकरमध्ये साजूक तूप घेऊन त्यात काजू आणि बदाम सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करा. ड्राय फ्रुट चांगले तळल्यानंतर पॅनमधून काढून बाजूला ठेवा.

कुकरमध्ये भिजवलेले तांदुळ घालून त्यात अडीच कप पाणी घाला –

आता त्याच साजूक तूपात चिरलेले सुक्या खोब-याचे तुकडे परतून घ्या व बाजूला काढा. आता त्याच कुकरमध्ये आणखी थोडं तूप घालून तमालपत्र, दालचिनी आणि लवंग चांगलं परतून घ्या. पुढे, कुकरमध्ये भिजवलेले तांदुळ घालून त्यामध्ये अडीच कप पाणी घाला. तांदुळ जास्त ढवळू नका नाहीतर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. आता त्या तांदळामध्ये खायचा रंग (food colour) घाला.

वाफ गेल्यानंतर साखर घालून सर्व सामग्री मिक्स करा –

पाणी उकळू लागताच त्यामध्ये केशर घाला आणि ३ शिट्ट्या करुन घ्या. वाफ निघून गेल्यानंतर त्यामध्ये साखर घालून सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन घ्या. आता झाकण पुन्हा बंद करुन कुकर बाजूला ठेऊन द्या.

गार्निशिंग करा –
भात सर्व्ह करण्याआधी काजू, पिस्ता, वेलची पावडर, केशरच्या कांड्या आणि खोब-याच्या तुकड्यांनी गार्निशिंग करा. अशाप्रकारे तयार झालाय आपला खमंग साखर केशरी भात! हा भात सर्व्ह करण्याआधी काजू, पिस्ता, वेलची पावडर, केशरच्या कांड्या आणि खोब-याच्या तुकड्यांनी गार्निशिंग करा. हा भाताचा तुम्ही आपल्या आवडीनुसार गरम किंवा थंड करुन आस्वाद घेऊ शकता.

हेही वाचा >> Bhaubeej 2023: यंदा भाऊबीजसाठी करा ‘या’ खास झणझणीत नॉनव्हेज रेसिपी; लगेच नोट करा रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नातेवाईक व मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा.