Breakfast Recipe : सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, डोसा, इडली खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एक आगळा वेगळा नाश्ता करू शकता. गव्हाच्या पिठापासून तु्म्ही सकाळी झटपट नाश्ता बनवू शकता. हा नाश्ता चवीला अप्रतिम आणि तितकाच पौष्टिक आहे. पोटभरुन नाश्ता करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. हा नाश्ता कसा बनवायचा , जाणून घेऊ या.

साहित्य

 • बेसन
 • हिरवी मिरची
 • आलं लसूण
 • जिरे
 • कोथिंबीर
 • गव्हाचे पीठ
 • दही
 • साखर
 • तेल
 • बटाटा
 • गाजर
 • लाल मिरची पावडर
 • हळद
 • जिरेपूड
 • चाट मसाला
 • गरम मसाला
 • बारीक चिरलेला कांदा
 • हिरवी मिरची
 • शेंगदाणे
 • चण्याची डाळ
 • चवीनुसार मीठ

हेही वाचा : Breakfast Recipe : फक्त १ कप रव्यापासून बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ, पोटभर नाश्ता होईल; रेसिपी लगेच नोट करा

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

कृती

 • सुरुवातीला एका भांड्यामध्ये जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्या.
 • त्यात बेसन टाका.
 • त्यानंतर उकळलेला बटाटा सोलून घ्या.
 • या बटाट्या काप करा आणि त्यात टाका
 • सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.
 • त्यानंतर हे मिश्रण झाकून ठेवा.
 • एका भांड्यामध्ये दही घ्या. या दह्यामध्ये चवीनुसार मीठ टाका.
 • त्यानंतर त्यात साखर टाका.
 • त्यानंतर त्यात थोडे तेल टाका.
 • हे मिश्रण पाच मिनिटे झाकूण ठेवा.
 • त्यानंतर या दह्याच्या मिश्रणामध्ये मिक्समध्ये बारीक केलेले मिश्रण एकत्रित करा.
 • त्यानंतर या मिश्रणामध्ये बारीक चिरलेले कांदे टाका.
 • त्यानंतर बारीक किसलेला गाजर टाका.
 • त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
 • त्यानंतर लाल मिरची पावडर टाका.
 • त्यानंतर यात हळद, गरम मसाला, जिरेपूड आणि चाट मसाला टाका.
 • मिश्रण चांगले एकजीव करा.
 • त्यानंतर यात थोडे थोडे गव्हाचे पीठ टाका आणि मिश्रण एकजीव करा.
 • त्यानंतर हे मिश्रण पाच मिनिटे झाकून ठेवा.
 • एक कढई घ्या आणि गॅसवर ठेवा.
 • त्यानंतर या कढईत तेल गरम करा.
 • गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाका
 • एक चमचा चण्याची डाळ टाका
 • त्यानंतर एक चमचा शेंगदाणे टाका
 • त्यानंतर यात आलं लसूण टाका
 • त्यानंतर यात कोथिंबीर घाला.
 • त्यात हिरवी मिरची घाला.
 • चांगले परतून घ्या आणि गॅस बंद करा.
 • हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडे पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
 • त्यानंतर कढईत तेल गरम करा.
 • गरम तेलात जिरे, सरसोचे दाणे, लाल मिरची टाका.
 • त्यानंतर हा तडका मिक्सरमधून बारीक केलेल्या मिश्रणामध्ये टाका. तुमची चटणी तयार होईल.
 • झाकून ठेवलेले गव्हाचे मिश्रण घ्या.
 • एक तवा घ्या आणि गॅसवर ठेवा.
 • गरम तव्यावर तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर यावर गव्हाचे मिश्रण पसरुन घ्या.
 • तुमच्या आवडीनुसार याचा आकार ठेवा.
 • दोन्ही बाजूने कमी आचेवर भाजून घ्या.
 • तुमचा नाश्ता तयार होईल.
 • चटणीबरोबर तुम्ही हे गव्हाचे धपाटे खाऊ शकता.