Breakfast Recipe : नाश्ताला काय बनवावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. जर तुम्ही नेहमी नेहमी नाश्ताला पोहे, उपमा खाऊन कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. फक्त एक कप रव्यापासून तुम्ही एक आगळा वेगळा पदार्थ बनवू शकता. हा कुरकुरीत पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. पोटभर नाश्त्यासाठी हा एक पर्याय उत्तम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नाश्ता कसा बनवावा तर टेन्शन घेऊ नका, यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

 • रवा
 • तांदळाचे पीठ
 • दही
 • जिरे
 • हिरव्या मिरच्या
 • कढीपत्ता
 • बारीक चिरलेली कोबी
 • बारीक चिरलेला टोमॅटो
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ
 • आलं लसणाची पेस्ट
 • तेल

हेही वाचा : Spongy Bhaji : टम्म फुगणारी स्पंजी भजी खाल्ली का? ही सोपी रेसिपी नोट करा अन् लगेच बनवा

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

कृती

 • एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप रवा घ्या.
 • त्यात पाव चमचा तांदळाचे पीठ घ्या
 • त्यानंतर त्यात एक कप दही टाका.
 • त्यानंतर त्यात जिरे घाला
 • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यात टाका
 • आणि बारीक चिरलेला कढीपत्ता त्यात टाका.
 • त्यानंतर यात बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा टाका.
 • शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
 • त्यानंतर यात चवीनुसार मीठ घाला.
 • शेवटी हे सर्व मिश्रण एकत्र करा.
 • त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाका आणि मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करा.
 • त्यानंतर या मिश्रणात एक कप पाणी घाला.
 • हे मिश्रण जर घट्ट असेल तर अर्धा कप पाणी आणखी घाला.
 • दहा मिनिटे हे मिश्रण झाकूण ठेवा.
 • एक तवा गॅसवर ठेवा आणि त्यावर एक चमचा तेल गरम करा.
 • गरम तेलात हे मिश्रण तव्यावर पसरून घ्या.
 • त्यावर झाकण ठेवावे.
 • त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजावे.
 • दोन्ही बाजूने नीट भाजून घ्यावे
 • हा रव्यापासून बनवलेला हटके पदार्थ तयार होईल.
 • हा पदार्थ तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.