Corn Poha Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय करावे, हा प्रश्न नेहमी मनात होतो. नाश्त्यात वेगळा हटके पदार्थ बनवावा, असे वाटते पण नेमका कोणता पदार्थ बनवावा, हे कळत नाही. पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्वात जास्त आपण नाश्त्यामध्ये खातो तो पदार्थ म्हणजे पोहे पण तुम्ही नियमित नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळला असाल. पण आज आपण पोह्याची एक आगळी वेगळी खास रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी कॉर्न पोहे खाल्ले आहे का? हो, कॉर्न पोहे. चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपी अगदी सोपी असलेले कॉर्न पोहे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाणार. कॉर्न पोहे अतिशय पौष्टिक असून नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हे कॉर्न पोहे कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण टेन्शन घेऊ नका. ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

  • पोहे
  • बारीक चिरलेला कांदा
  • कॉर्न
  • बारीक चिरलेली मिरची
  • लिंबूचा रस
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • जिरे
  • मोहरी
  • हळद
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : Ulta Vadapav : नाशिकचा लोकप्रिय उल्टा वडापाव खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

One Cup Chana Dal Quick 50 Papad Marathi Recipe
Video: एका तासात एक वाटी चणाडाळीचे ५० पापड करा तयार; पळी पापडांची ही सोपी रेसिपी बघा, चवीसाठी काय वापराल?
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यामध्ये पोहे घ्या.
  • स्वच्छ पाण्याने पोहे हे एक दोन वेळा नीट धुवून घ्या
  • त्यानंतर धुतलेले पोहे १० मिनिटे चाळणीत निथळत ठेवा.
  • गॅसवर एक कढई ठेवा.
  • त्या कढईते तेल गरम करा.
  • त्यानंतर त्यात मोहरी, जिरे घाला.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
  • त्यावर कढीपत्ता घाला. कढीपत्तामुळे पोह्यांना अप्रतिम चव येते.
  • त्यानंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली मिरची घाला.
  • आणि त्यानंतर त्यात कॉर्न टाका.
  • कॉर्न दोन ते तीन मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका
  • थोडी चवीनुसार साखर टाका
  • आणि त्यानंतर हळद घाला.
  • त्यानंतर चाळणीत निथळत ठेवलेले पोहे त्यात टाका.
  • हे पोहे यामध्ये नीट एकजीव करा.
  • त्यात वरून लिंबाचा रस टाका
  • सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • कॉर्न पोहे तयार होईल.
  • तुम्ही हे गरमा गरम कॉर्न पोहे सर्व्ह करू शकता.