परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

साहित्य : –एका प्लेन स्पाँज केकचा अर्धा किंवा एक किलोचा बेस अथवा बिस्किटांचा चुरा, एका नारळाचा कीस, २ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, १ कप ताजी साय, वाफेवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये पातळ करून घेतलेले १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट, ५० ग्रॅम नारळाच्या दुधाची पूड, २ मोठे चमचे साखरेचा पातळ पाक किंवा रोझ सिरप.

कृती : स्पाँज केकचे पातळ स्लाइस करून घ्या. बिस्किटांचा चुरा वापरणार असाल तर त्यात  थोडासा साखरेचा पाक अथवा रोझ सिरप घालून घट्ट मळून घ्या. एका केकपात्रात हे मिश्रण पसरवून घ्या आणि त्याचा बेस तयार करा. बेक झाल्यानंतर तो थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. एका वाटीमध्ये साय फेटून घ्या. त्यात कंडेन्स्ड मिल्क, वितळवलेले व्हाइट चॉकलेट, रोझ सिरप, नारळाच्या दुधाची पूड आणि नारळाचा कीस एकत्र करा. हे फेटलेले मिश्रण केकपात्रात बिस्किटाच्या चुऱ्याच्या बेसवर किंवा स्पाँज केकच्या पातळ स्लाइसवर पसरवून घ्या. हे केकपात्र फ्रीजरमध्ये साधारण तासभर सेट करायला ठेवा. त्यानंतर केकपात्रातून हा कोकोनट केक काढा आणि तुकडे करून मस्त सजवून खायला द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nilesh@chefneel.com