लहान मुलेच काय पण कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून मोठे देखील नाक मुरडतात. पण जर तुम्हाला बाजारात ताजी कारली मिळाली तर नक्कीच घरी आणा आणि अशा प्रकारे तयार करा क्रिस्पी फ्राय कारली. लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे फ्राय कारली करून त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.
कारलं म्हंटलं की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण नाक मुरडतो. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का? मग ही एक चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा.
क्रिस्पी फ्राय कारली साहित्य
१/४ किलो कारली
१ चमचा लाल मसाला
१ चमचा हळद
१ चमचा चाट मसाला
१/२ चमचा काळ मीठ
चवीप्रमाणे मीठ
तळण्यासाठी तेल
२ चमचे बेसन
२ चमचे तांदळाचे पीठ
क्रिस्पी फ्राय कारली कृती
१. प्रथम कारले स्वच्छ धुऊन ते क्रॉस पातळ कापून घ्यावी कापल्यानंतर त्यात मसाला,हळद,मीठ,काळ मीठ,चाट मसाला,घालावा.
२. सर्व मसाले मिक्स करून दहा मिनिटे ठेवून देणे त्यानंतर बेसन व तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करावे.
हेही वाचा >> विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत भरवां टिंडे; वाचा सोपी मराठी रेसिपी
३. गॅस वर कढई ठेऊन त्यात तेल घालावे व ते चांगले गरम झाल्यावर थोडा फास्ट गॅसवर पीठ लावलेले कारले चांगले लाल होईपर्यंत तळावे क्रिस्पी कारले खाण्यास तयार.