आज शनिवार अनेकांच्याच सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हटलं की मस्तपैकी उशिरा उठणं आणि आवडत्या जेवणावर ताव मारणं आलंच. आता हे आवडतं जेवण कोणतं, तर बरेचजण उत्तर देतील चिकनचा बेत असणारं. तुम्हीही असाच बेत आखताय का? तर आज चिकनची एक स्पेशल रेसिपी ट्राय करा. या रेसिपीचं नाव आहे, दही चिकन. बनवायला ही सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर पाहुयात, कसे बनवायचे दही चिकन

दही चिकन बनवण्यासाठी साहित्य

Super Crispy And Delicious Fish Fry reciepe in marathi
खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अशी “बटर रोस्ट फ्रेंच बीन फिश फ्राय” ही घ्या रेसिपी
Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
  • १/२ किलो चिकन
  • १ कप दही
  • ३ कांदे चिरलेले
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • ३ लवंगा
  • १ मोठी वेलची
  • ४ हिरव्या वेलची
  • ६-७ काळ्या मिरी
  • २ तुकडे दालचिनी
  • २ टीस्पून खसखस
  • ५-६ काजू
  • ५-६ बदाम
  • २ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून धने पावडर
  • तेल
  • चवीनुसार मीठ

दही चिकन बनवण्याची कृती :

  • हे बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही घ्या. आता त्यात एक चमचा तिखट, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि मीठ घालून मिक्स करा.
  • आता या मिश्रणात चिकनचे तुकडे घाला. दही चिकन २-३ तास मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • तेल गरम झाल्यावर त्यात चिकनचे तुकडे टाकून तळून घ्या. आता हे बाजूला ठेवा. आता या गरम तेलात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता तळलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. नंतर मिक्सरमध्ये लसूण, आले, काळी आणि हिरवी वेलची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंगा यांची पेस्ट बनवा.

हेही वाचा >> अंडा फ्लावरची रस्सा भाजी; ही हटके रेसिपी लगेच नोट करा

  • यानंतर खसखस, बदाम आणि काजू सुद्धा ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता कढईत तेल गरम करायला ठेवा.
  • त्यात लसूण-आले पेस्ट, तिखट, धनेपूड, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
  • नंतर मसाल्यामध्ये कांद्याची पेस्ट आणि दही घालून १० मिनिटे शिजवा.