रोज उठून नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर कायम असतो. सतत पोहे, उपीट करुन कंटाळा आला की सकाळी घाईच्या वेळात चहा-बिस्कीट खाऊन अनेक जण कॉलेज किंवा ऑफीसला बाहेर पडतात. पण सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा असून तो पोटभरीचा आणि पौष्टीक असणे आवश्यक असते. दलिया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये आपण गव्हाचा दलिया, वेगवेगळ्या डाळी आणि धान्ये एकत्र असा दलिया असे आपल्या आवडीनुसार करु शकतो. नैवैद्य म्हणूनही तुम्ही श्रावणी शुक्रवारसाठी ही रेसिपी करु शकता.

दलिया साहित्य

१/२ कप गव्हाचा रवा
१/२ कप किसलेला गूळ
१ टेबलस्पून साजूक तूप
२ टेबलस्पून ओले खोबरे चव
१/४ टीस्पून वेलची पावडर
१/४ कप दूध

दलिया रेसिपी

१. गव्हाचा रवा घेणे.धुवून, त्यात थोडेसे पाणी घालून कुकरला लावून २-३ शिट्टया करून घेणे.

२. गॅसवर पातेले ठेवणे तापत ठेवून त्यात तूप घालावे.तूपावर खोबरे चव घालून १ मिनिटे परतवून घेणे. नंतर शिजवून घेतलेला गव्हाचा रवा घालून परतवून घेणे.

३. गूळ घालून,त्याचे पाणी आटेपर्यंत शिजवून घेणे. घट्ट झाले की, गॅस बंद करावा. वेलची पावडर घालून मिक्स करावे.

हेही वाचा >> Shravan special: श्रावण स्पेशल व्हेज थाळी; पारंपारिक पद्धतीने बनवलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा

४. दूध घालून मिक्स करून घेणे. दलिया गरम गरमच खावा, खूप छान लागतो.दूध लगेचच आळते,म्हणून खायला घेताना गरम दूध घालावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. दलियामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस असतात, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि प्रोटीन, लोह यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी दलिया खाणे फायद्याचे ठरते.