Diwali 2023 Recipes : दिवाळीचा फराळ म्हटलं प्रत्येकाला आठवते चकली, चिवडा, कंरजी. हे पदार्थ सहसा दिवाळीत केले जातात. पण एक पदार्थ असा आहे जो केव्हाही आवडीने खाल्ला जातो. तो म्हणजे बुंदी. बुंदी अनेकांना खायला आवडते. त्यातही प्रत्येकाची बुंदी खाण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाला गोड बुंदी आणि शेव खायला आवडते तर कोणाला तिखट बुंदीचा चिवडा. नुसती गोड बुंदी अनेकांना खायला आवडते तर काहींना गोड बुंदीचे बांधलेले लाडू आवडतात. बऱ्याच मंदिरामध्ये बुंदी प्रसाद म्हणून देतात तर महाराष्ट्रा ग्रामीण भागातील लग्नामध्ये बुंदी हमखास असते. काही लोकांना खारी किंवा तिखट चवीची कुरकुरीत बुंदी नुसती खायला आवडते. काही लोक तिखट बुंदी वेगळ्या चिवडा अथवा फरसाण मध्ये वापरतात. तर काही लोकांना बुंदीचा रायता किंवा ताकामध्ये टाकलेली बुंदी आवडते. आज आम्ही तुम्हाला तिखट बुंदी कशी तयार करायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…

साहित्य-

  • २ कप बेसनपीठ
  • मीठ
  • चिमूटभर खाण्याचा सोडा
  • खाण्याचा केशरी रंग (ऐच्छिक )
  • हिंग
  • चाट मसाला
  • बेडगी मिरचीचे तिखट

Diwali Faral : कुरकुरीत शेव खायला आवडते? मग आता घरीच बनवा, जाणून घ्या बेसन शेव रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती
दोन कप बारीक दळलेले किंवा विकतचे बेसनपीठ घ्यावे. त्यात मीठ आणि खाण्याचा केसरी रंग एक थेंब टाका. थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवा. पीठ चांगले फेटून त्यातील सर्व गाठी काढून टाका. गोड बुंदीसाठी करतो त्याप्रमाणेच हे पीठ करून घ्यावे. एक चमचा पाणी आणि चिमुटभर बेकिंग सोडा टाकावा मिक्स करून घ्यावा. बुंदीचे पीठ तयार आहे. बुंदी तळण्यासाठी तेल गरम करावे आणि गॅस मोठा ठेवा.
तेलाचा मोठा डब्बा किंवा स्टिलचा मोठा डबा घ्या. एका हाताने मोठा झारा कढईवर धरा, झाऱ्याला डब्याचा आधार द्या. दुसऱ्या हाताने झाताने झाऱ्यामध्ये पीठ टाका. झारा हलेकच डब्यावर आपटला की बुंदी तेलात पडेल. जर गोल बुंदी पडत नसेल तर पीठ पातळ झाले आहे. थोडेसे बेसपीठ टाकून घट्ट करून घ्या. झाऱ्यातून बंदीच खाली पडत नसेल तर पीठ घट्ट झाले आहे. पीठात चमचा पाणी टाकून तोडे पातळ करा. बुंदी पडेल.
मंद आचेवर बुंदी तळून घ्या. तयार बुंदीला हिंग, चाट मसाला, बेडगी मिरचीचे तिखट टाकून घ्या. चटपटीत, कुरकुरीत बुंदीत तयार आहे.