पोहे, शिरा, उपमा महाराष्ट्र्रातील घरोघरी हमखास केले जाणारे आणि सहसा सगळ्यांना आवडणारे पदार्थ आहेत. पटकन व पौष्टिक होणारा असा नाश्ता खायला कोणाला खायला अडवणार नाही.तर आज आपण उपमा या पदार्थाची एक अनोखी रेसिपी पाहणार आहोत. ‘गाजराचा उपमा’ कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर एका युजरने या पदार्थाची सोपी रेसिपी दाखवली आहे. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • २ वाट्या किसलेले गाजर
  • १/२ वाटी रवा (रवा)
  • १ कांदा
  • १ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा तूप
  • १ चमचा मोहरी
  • मूठभर कढीपत्ता
  • २.५ कप पाणी
  • कोथिंबीर
  • मीठ

हेही वाचा…‘व्हेज’ ऑमलेट कधी खाल्लं आहे का? पाहा ‘या’ अनोख्या पदार्थाची सोपी रेसिपी…

कृती :

  • १/२ वाटी रवा पॅनमध्ये खरपूस भाजून घ्यावा.
  • त्यानंतर कढईत किंवा भांड्यात तूप घाला व त्यात मोहरी, कढीपत्ता हिरवी मिरची घालून परतवून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, गाजराचा किस व मीठ घालून मिश्रण परतवून घ्या.
  • त्यानंतर खरपूस भाजून घेतलेला रवा व थोडं पाणी घालून परतवून घ्या.
  • नंतर त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवावे.
  • आवडीनुसार वरून कोथिंबीर घाला.
  • तुमचा ‘गाजराचा उपमा’ तयार.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @thenutricookhouse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.