पावसाळ्यातील आपला आहार काय आहे, यावरही आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपण जर नको ते पदार्थ नको तितक्या प्रमाणात खाल्ले तर आपलं बरंचसं नुकसान होऊ शकतं. पावसाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. आज आम्ही चुमच्यासाठी पौष्टीक अशी दुधी भोपळ्याीची खीर रेसिपी आणलीय.
दुधी भोपळा असं नाव घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. भोपळ्याची भाजी तर अनेकांना नकोच असते. पण भोपळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा असे सांगितले जाते. मग पावसाच्या दिवसांत गरमागरम आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल तर दुधी भोपळ्याची खीर हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दुधी भोपळ्याच्या खीरीसाठी लागणारे साहित्य:
- अर्धा किलोचा दुधी भोपळा
- एक लिटर कोरं दूध
- एक चमचा तूप
- एक ते दोन चमचा गव्हाचे भाजलेले पिठं
- साखर (आपल्या आवडीनुसार)
- काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक काप
- वेलची पावडर
- केशर
दुधी भोपळ्याच्या खीर कृती :
- सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धूवून पुसून घ्यावा. नंतर भोपळा किसणीवर चांगला किसून बारीक करावा. पुढे भोपळ्याच्या किसाला १ ते २ चमचे भाजलेलं पिठ लावून त्याच्या प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढून घ्याव्यात.
- कुकर थंड झाल्यावर त्यातील वाफाळलेला भोपळयांचा किस काढून घ्यावा. तो किस पातेल्यात टाकून त्यात कोरं दूध घालून गॅसवर ठेवावा.
- भोपळ्याचा किस घातलेल्या दुधाला चांगली उकळी आली की मग त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घालावी. नंतर विलायची पावडर, केशर, काजू, बदाम व पिस्ते काप टाकावे.
हेही वाचा – Kanda Bhaji : कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, लिहून घ्या ही रेसिपी…
- (भोपळा जर लालसर असला तर मग केशर घालायची गरज नाही) खीरीला दुसरी उकळी येईपर्यंत चांगल ढवळत राहावं आणि खीर (Dudhi Bhopla Kheer)खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.