Paneer cutlets recipe: आपल्याकडे अनेकांचे सोमवार, मंगळवार, गुरुवार, संकष्टी आणि एकादशीला उपवास असतात. उपवास म्हटलं की, सर्रास साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण, सतत साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही उपवासाचे पनीर कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

पनीर कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. ३०० ग्रॅम पनीर
२. १ कप शिंगाड्याचे पीठ
३. ५-६ हिरव्या मिरच्या
४. १ चमचा लिंबाचा रस
५. १ वाटी कोथिंबीर
६. चवीप्रमाणे मीठ

Karlyachi Chutney Recipe In Marathi Karlyachi Chutney recipe
कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! नक्की ट्राय करा
Make tasty Masala Puri in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा टेस्टी ‘मसाला पुरी’, ही घ्या सोपी रेसिपी
easy recipe from only four onions
VIDEO : घरात भाजी नसेल तर टेन्शन घेऊ नका; ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
How To Cook Lal mathachi bhaji Note Down This Home Made Maharashtrian Recipe Note down Recipe Traditional Recipe
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुगुणी ‘लालमाठची भाजी’ ठरेल उपयोगी; रेसिपी लिहून घ्या अन् आरोग्यदायी फायदेही वाचा
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
Carrot Smoothie Recipe In Marathi
Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
raan bhaji shevalachi bhaji how to make shevlyachi bhaji at home dragon stalk yam recipe
पावसाळ्यात बनवा मटणासारखी चमचमीत ‘शेवळाची भाजी’; ही घ्या सोपी रेपिसी

पनीर कटलेट बनवण्याची कृती:

हेही वाचा: अशी बनवा ‘ओव्याच्या पानाची पौष्टिक भजी’; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी पनीर व्यवस्थित किसून घ्या आणि त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

२. त्यानंतर शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या व त्यात किसलेले पनीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिक्स करून घ्या.

३. आता त्यामध्ये लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

४. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचे कटलेट बनवून घ्या.

५. आता गरम तव्यावर तेल घालून कटलेट दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या.

६. गरमा गरम उपवासाचे पनीर कटलेट दह्यासोबत सर्व्ह करा.