Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi: अनेकदा उपवास असला की साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. अनेकदा महिला उपवासाच्या विविध रेसिपी ट्राय करत असतात. पण नेहमीच त्या रेसिपींना यश मिळेल असं नाही. तुम्हालाही जर या साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण उपवासाचे क्रंची साबुदाणा पाॅप्स कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य…

साहित्य

  1. १ वाटी साबुदाणा
  2. १ ते १/२ शेंगदाणा पीठ
  3. २ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
  4. १/२ टीस्पून काळी मिरची पावडर
  5. १ टीस्पून जीरा पावडर
  6. सेंधा मीठ
  7. २ बटाटे उकडून
  8. कोथिंबिर चिरून
  9. तेल तळण्यासाठी

कृती

  • सर्वप्रथम साबुदाणा भाजून घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्या.
  • आता शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचे पीठ तयार करून घ्या.
  • आता साबुदाणा पीठ आणि शेंगदाणे पीठ एकत्र करून त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, सेंधा मीठ, कोथिंबीर आणि बटाटे घालून एकत्र करून घ्यावेत.
  • यानंतर छान गोळा तयार करून घेऊन आणि छोट्या छोट्या पॉप्स तयार करून घ्या आणि त्याला छान तळून घ्या.
  • मध्यम गॅसवर छान तेलात पाॅप्स तळून घ्या, मिक्सर मध्ये हिरवी मिरची चटणी तयार करून घ्या.
  • उपवासाचे गरमागरम साबुदाण्याचे क्रंची पाॅप्स तयार आहेत.

(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)