‘वांगी’ हा भाजीचा असा प्रकार आहे की अनेकजण आवडत नाही म्हणून नाकं मुरडतात. वांग्याची भाजी ताटात वाढलेली बघून आपल्याला जेवण नकोसे वाटते. वांग्यातील त्या लहान – लहान बिया असो किंवा अगदीच मऊ लगदा झालेल्या वांग्याचा फोडी असो, यांसारख्या अनेक कारणांनी आपल्याला वांगे खाणे आवडत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी. या पद्धतीनं वागं बनवाल तर नावडतीची भाजीही होईल आवडीची…
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी साहित्य
- २ बटाटा
- २ वांगी
- १ कांदा
- १ टोमॅटो
- सहा-सात लसणाच्या पाकळ्या
- २ चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण
- १ चमचा आलं लसूण पेस्ट
- १ चमचा जीरे
- १ चमचा राई
- १/२ चमचा हिंग
- २ चमचे मसाला
- १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
- १ चमचा हळद
- १ चमचा गरम मसाला
- २ पळी तेल
- चवीप्रमाणे मीठ
- १ चमचा साखर
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी कृती
१. प्रथम वांग बटाटा स्वच्छ धुऊन साधारण फिंगर्स च्या आकाराचे कापून घेणे.
२. गॅसवर कढई ठेवून चिरलेले वांगे व बटाटा घालून त्यात थोडेसे तेल घालावे व चांगले भाजून घ्यावे थोडे शिजल्यानंतर ते एका ताटात काढून त्याच कढईत तेल घालावे राई, जीरे व ठेचलेले लसूण, कांदा फोडणीला घालावा.
३. कांदा थोडा शिजल्यानंतर त्यात खोबऱ्याची पेस्ट आले लसूण ची पेस्ट व टोमॅटो घालून चांगले शिजवून घेणे त्यानंतर मीठ, मसाला, गरम मसाला, हळद,लाल तिखट घालून सर्व एकजीव करणे. व त्यानंतर काय केलेल्या मधील फक्त बटाटा घालावा.
हेही वाचा >> नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने
४. बटाटा घातल्यानंतर त्यात थोडे पाणी घालावे व बटाटा थोडा कच्चा असेल तर तो चांगला शिजू द्यावा तो शिजल्यानंतर फ्राय केलेले वांगे घालावे व परत एक वाफ येऊ देणे सर्व्ह करण्यास रेडी.