Gavhachya Pithache Dhirde : तुम्ही अनेकदा बेसनाचे धिरडे खाल्ले असेल पण तुम्ही कधी गव्हाच्या पीठापासून बनवता येणारे धिरडे खाल्ले आहे का? गव्हाच्या पीठाचे धिरडे अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. हे धिरडे नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. याशिवाय लहान मुलांना सुद्धा तुम्ही डब्यावर हे धिरडे देऊ शकता. फक्त दहा मिनिटांमध्ये होणारी ही सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊ या.

साहित्य

  • गव्हाचं पीठ
  • रवा
  • तेल
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • गाजर
  • कोथिंबीर
  • पाणी

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

कृती

  • एक वाटी गव्हाचं पीठ घाला आणि त्यात मोठे दोन चमचे रवा घाला
  • त्यात चवीनुसार मीठ घाला
  • थोडे थोडे पाणी घाला
  • पातळ मिश्रण तयार होईल
  • एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि मोहरी घाला आणि त्यात हिंग घाला.
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि गाजर त्यात घाला.
  • चांगले परतून घ्या आणि गॅस बंद करा
  • त्यानंतर गव्हाचे पीठ आणि रवापासून बनवलेल्या मिश्रणामध्ये हे परतून घेतेलेली फोडणी घाला.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाका
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • नॉन स्टिक तवा घ्या
  • गरम तव्यावर थोडं तेल लावा
  • आणि त्यावर पातळ धिरडं घाला
  • मंद आचेवर धिरडं दोन्ही बाजूने भाजून घ्या
  • हे धिरडं तुम्ही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.