घाटी मसाला चटणी ही सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर या भागात विशेष करून स्वयंपाकात वापरतात. ही मसाला चटणी करणे मोठे कष्टदायक काम आहे.पण घरी बनवलेली चव काही न्यारीच असते. मग त्यात आपण एक शाॅर्टकट वापरू शकतो. अगदी मिरच्या आणणे, वाळविणे, कुटणे व मिरची पूड करणे,व नंतर पुढे मसाला करणे .या महाकष्टमय कामापेक्षा मिरचीपूड तयार आणावी व बाकी सर्व गरम मसाले,ओला मसाला घरी आणून मग चटणी करावी. लवकर होते.शहरी भागात रहात असू तर मिरच्या आणणे व वाळवणे जिकीरीचे होते. हा मसाला नुसता ही खायला भाकरी,चपाती सोबत सर्वाना आवडतोच ! चला तर मग हा झटपट मसाला कसा करायचा पाहू. ही रेसिपी पाहा आणि अचूक प्रमाणात वर्षभर पुरेल एवढा मसाला बनवा.

१ किलो घाटी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • संकेश्वरी मिरची – १/४ किलो
  • लवंगी मिरची – १००ग्राम
  • सुखे खोबरे – १ वाटी
  • धने – २००ग्राम
  • सफेद तीळ – १००ग्राम
  • कांदे – २ मोठे
  • बडीशेप – २ टी स्पून
  • मसाला वेलची – ८ नग
  • लाल फुल – १
  • चक्री फुल – २ नग
  • हिरवी वेलची – ८ नग
  • जायफळ – अर्ध नग
  • काली मिरी – १५ ग्राम
  • मेथी – १० ग्राम
  • खसखस – २० ग्राम
  • तिरफळ – ८ नग
  • दालचिनी – १० ग्राम
  • लवंग – १० ग्राम
  • शाही जिरे – १० ग्राम
  • तेजपत्ता – ८ पाने
  • जिरे – १० ग्राम
  • दगडी फुल – १० ग्राम
  • लसूण – ३ मोठे कांदे
  • अद्रक – ५० ग्राम
  • कोथिंबीर – ५० ग्राम

घाटी मसाला बनवण्याची योग्य पद्धत –

  • कांद्याचे पातळ तुकडे करून तेलात सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा, त्यांना थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
    जड-तळाच्या पॅनमध्ये, किसलेले खोबरे गडद तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.
  • त्याच पॅनमध्ये, लाल मिरच्या (दोन्ही प्रकारच्या) कुरकुरीत आणि गडद तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
    तसेच महाराष्ट्रीयन गरम मसाला मिश्रण हलका तपकिरी होईपर्यंत तळा, ही प्रक्रिया मध्यम आचेवर करा.
  • आता वर दिलेल्या साहित्यातील प्रत्येक पदार्थ वेगवेगळं तळा, कारण तरच ते नीट भाजलं जाईल.
    जर तुम्ही हळदीऐवजी जायफळ पावडर आणि हळद पावडर वापरत असाल तर ते हलके गरम करा.
  • सर्व मसाले थंड झाल्यावर प्रथम भाजलेला गरम मसाला बारीक करून घ्या आणि त्यात लाल मिरची पावडर घालून बारीक करा.
  • आता त्यात भाजलेले कोरडे खोबरे, लसूण आणि तळलेले कांदे घालून बारीक वाटून घ्या.
    तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.
  • नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !