गावाकडे जर भाजी तयार नसेल तर भाजीला उत्तम पर्याय म्हणजे ठेचा असतोच. त्यामुळे गावातील प्रत्येकाला आजही हिरवी मिरची ठेचा हा आपलासा वाटतो. जेवण मिळमिळीत असेल किंवा काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. हिरव्या मिरचीचा ठेचा हा खायला खूपच भारी लागतो. याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते आणि तिखटपणा म्हणजे चटका आठवणीत राहतो. मात्र आज आपण खानदेशी स्पेशल मीरचीचा ठेचा पाहणार आहोत. चला तर मग आज जाणून घेऊया या हिरव्या मिरचीची ठेचा कसा करायचा याची रेसिपी.

थंडीत भाकरीसोबत किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावणीसाठी ठेचा खाणारे बरेचजण असतात. ठेचा बनवणं सोपं असलं तरी परफेक्ट चव येण्यासाठी ठेचा बनवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असाव्या लागतात. दाखवल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो केल्यास ठेचा झटपट तयार होईल.

खानदेशी मिरचीचा ठेचा साहित्य

  • १०० ग्रॅम हिरवी मिरची
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • ३० ग्रॅम शेंगदाणे
  • १ चमचा जीरे
  • १ चमचा तीळ
  • मीठ चवीनुसार
  • १ चमचा तेल
  • २ चमचे कोथिंबीर

खानदेशी मिरचीचा ठेचा कृती

स्टेप १
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या. हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्या स्वच्छ पाण्याने धुवून घाव्या.नंतर त्या धुतलेल्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे.

स्टेप २

त्यानंतर एका लोखंडी कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की हिरव्या मिरची बारीक केलेले तुकडे निट भाजून घ्यावे.

स्टेप ३

नंतर लसूण आणि शेंगदाणे देखील चांगले खरपूस भाजून घ्यावे.

स्टेप ४
मिरची थोडी भाजली की त्यात जीरे, तीळ,लसूण,तेल घाला व पुन्हा छान खरपूस भाजून घ्या,भाजून थोडं थंड झालं की मीठ घालून खलबत्यामध्ये शेंगदाणे व मिरची कुटून घ्या,मग झाला आपला झणझणीत ठेचा तयार

हेही वाचा >> Khandeshi Bhaji Recipe: १० मिनिटांत बनवा झणझणीत खानदेशी स्टाईल ‘रस्सा भाजी’, नोट करा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ५
दाखवल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो केल्यास ठेचा झटपट तयार होईल. शेवटी कोथिंबीर घाला, तुम्ही हा ठेचा गरमागरम भाकरी ,पोळीसोबत खाऊ शकता.