Gudi Padwa Special Recipe : पुरण पोळी हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरण पोळी ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यात आवडीने खाल्ली जाते. या खास मराठमोळ्या पदार्थाची लोकप्रियता सातासमुद्रापलीकडे पसरलेली आहे. जेव्हा कधी गोड खावेसे वाटते, घरी खास पाहूणे येतात किंवा सणवार असतो तेव्हा पुरणपोळीचा बेत आखला जातो. मराठी वर्षाचा पहिला सणाला तुम्ही काय खास बनवणार आहात? गुढी पाडव्यानिमित्त तुम्ही पुरण पोळी बनवू शकता. पुरण पोळी विविध प्रकारे केली जाते पण तुम्ही कधी विदर्भ स्टाईल पुरण पोळी खाल्ली आहे का? जाणून घेऊ या, ही खास पुरण पोळी कशी बनवायची?

साहित्य

  • १ कप धुतलेली चणा डाळ
  • ३ कप पाणी
  • १ कप साखर
  • १ चमचा वेलची पावडर
  • १ चमचा जायफळ पावडर
  • १ वाटी कणीक आणि मैदा
  • चविनुसार मीठ
  • तूप

हेही वाचा : 90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच

कृती

  • सर्व प्रथम पुरणपोळीचे मिश्रण तयार करा.
  • यासाठी हरभऱ्याची डाळ धुवून कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
  • डाळ पूर्ण शिजल्यानंतर त्यात साखर घाला.
  • आता हे मिश्रण काही वेळ शिजवा आणि पाकास येऊ द्या.
  • पुरणाचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर ढवळत रहा.
  • थोड्या प्रमाणात पुरणाला रंग आल्यानंतर त्यात वेलची पूड आणि बारीक किसलेले जायफळ घाला.
  • आता पुन्हा हे संपूर्ण मिश्रण चांगल्याने ढवळून घ्या.
  • हे मिश्रण थंड होण्यापूर्वी पुरण यंत्रातून बारीक करून घ्या.
  • यानंतर बारीक केलेले पुरण थोडा वेळ थंड होऊ द्या.
  • आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या.
  • त्यात मीठ आणि तूप घालून पीठ चांगल्याने मळून घ्या.
  • ही मळलेली कणीक ओल्या कापडाने ३० मिनिटे झाकून घ्या
  • आता कणकीचा छोटा गोळा घ्या त्यात मुठभर पुरण भरा आणि हलक्या हाताने पुरण पोळी जाडसर लाटा.
  • ही गोल लाटून तयार केलेली पुरण पोळी तव्यावर दोन्ही बाजूने चांगल्याने भाजून घ्या.
  • तुमची स्वादिष्ट विदर्भ स्टाईल पुरण पोळी तयार आहे.
  • तुम्ही ही पुरण पोळी दही, दुध किंवा तुपाबरोबर सर्व्ह करू शकता.