Shevaya upma recipe : सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही पौष्टिक नाश्त्यासाठी एक हटके पदार्थ करू शकता. तुम्ही शेवईचा चवदार असा उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. झटपट होणारा हा पदार्थ चवीला अप्रतिम आणि तितकाच पौष्टिक आहे. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत कोणीही हा पौष्टिक असा नाश्ता कोणालाही आवडले. तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेवईचा उपमा कसा बनवायचा, तर त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य
- तेल
- कांदा
- हिरवे मिरचे
- मोहरी
- कढीपत्ता
- जिरे
- आलं लसणाची पेस्ट
- शेंगदाणे
- मटार
- हळद
- लाल तिखट
- गरम मसाला
- मीठ
- टोमॅटो
- पाणी
- कोथिंबीर
हेही वाचा : Sweet Dish : एक कप रव्यापासून बनवा हा गोड पदार्थ, झटपट होणारी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
कृती
- सुरुवातीला एका प्लेटमध्ये शेवई घ्या. ही शेवई थोडी जाडसर असावी.
- एका कढईत तेल गरम करा आणि या गरम तेलातून ही शेवई भाजून घ्या.
- त्यानंतर कढईतून भाजलेली शेवई एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करा.
- या तेलामध्ये जिरे, मोहरी, आणि कढीपत्ता टाका.
- तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मटार किंवा शेंगदाणे टाकू शकता.
- त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची त्यात टाका.
- कांदे मिरचे नीट परतून झाले की त्यात अगदी थोडी आलं लसणाची पेस्ट टाका. यामुळे शेवईला चव येते.
- त्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट (अगदी कमी प्रमाणात), मीठ आणि थोडा गरम मसाला टाका.
- तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही बारीक चिरलेले टोमॅटो टाकू शकता. यामुळे शेवईची चव अप्रतिम वाटते.
- टोमॅटो चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यात भाजलेली शेवई टाका आणी नीट परतून घ्या.
- आता यात गरम केलेले पाणी टाका. एक कप शेवईसाठी दिड कप पाणी या हिशोबाने तुम्ही शेवईच्या प्रमाणानुसार पाणी टाका.
- कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर शेवई शिजवून घ्या.
- शेवई शिजल्यानंतर त्यात बारीत चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम शेवईचा उपमा सर्व्ह करा.