पावसाळ्यात काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा, कॉफी प्यायला आवडत असेल तरी सारखं सारखं चहा-कॉफी पिणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर सूप हा उत्तम पर्याय आहे. पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.

क्रिम गार्लिक मशरूम सूप साहित्य

४-५ मशरूम
१/२ कप चिरलेला कांदा
२-३ लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
३-४ कोथिंबीर काड्या
कोथिंबीर
१ टेबलस्पून बटर
१ टीस्पून मिरपूड
चवीनुसार मीठ
१/२ कप दूध
१ टेबलस्पून लिंबू रस
आवश्यकतेनुसार पाणी

क्रिम गार्लिक मशरूम सूप रेसिपी

१. मशरूम कांदा कोथिंबीर काड्या आलं लसूण लिंबू चिरून घ्यावा. पॅनमध्ये बटर घालून त्यावर आलं लसूण कांदा कोथिंबीर काड्या घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे.

२. मशरूम मीठ मिरपूड घालून एकत्र करावे २-३ मिनिटे शिजू द्यावे आणि मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

३. मशरूम चांगले धुवून घ्या आणि त्याचे दोन- दोन तुकडे करून घ्या. कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम आणि बारीक चिरलेला लसून मीठ आणि काळी मिरी टाकून परतून घ्या आणि त्यानंतर मशरूम चांगले शिजवून घ्या.

४. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाका. बटर वितरळ्यावर मैदा टाका. मैद्याचा रंग थोडासा बदलला की त्यामध्ये मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक टाका. आता त्यामध्ये थाईम टाका आणि हे मिश्रण वारंवार हलवत रहा.

हेही वाचा >> Chicken Soup Recipe: पावसाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे एग चिकन सूप; घरी नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. सूप घट्ट होण्यास सुरूवात झाली की त्यामध्ये थोडा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका.