केळं हे आरोग्यासाठी लाभदायी आहे आपल्याला माहितच आहे. केळ्यापासून तयार केले जाणारे वेगवेगळे पदार्थ आहेत ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. तुम्हाला हेल्दी आणि काहीतरी वेगळा पदार्थ खायचा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी सोपी रेसिपी आहे ती म्हणजे केळयाची पोळी. ही रेसिपी तयार करायला फार वेळ लागत नाही. केळ्याची पोळी अगदी चविष्ट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ नक्की आवडेल. एकदा तयार करून पाहा ही घ्या रेसिपी

केळ्याची पोळी रेसिपी

साहित्य-
केळी ३,
साखर २ वाट्या,
तूप ३ मोठे चमचे,
दालचिनी १० ग्रॅम,
मैदा – ३ वाटी,
मैदा लाटण्यासाठी
मीठ -चवीनुसार
पाणी

हेही वाचा – रोज रताळे खाऊन कंटाळात? चविष्ट आणि हेल्दी रताळ्याचे कटलेट एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती
प्रथम केळी प्रेशर कुकरमध्ये शिजवा. त्याची साल काढून टाका. नंतर केळी कुस्करून घ्या, साखर, तूप, वेलची पूड मिसळा, मंद गॅसवर ठेवा, मिश्रण थंड होऊ या भांड्यावर झाकण ठेवा. त्यात मैदा. थोडे मीठ, तेल घालून पाण्याने भिजवा, कणकेचे बारा गोळे करा. केळ्याच्या मिश्रणाचेही १२ गोळे करा, मैद्याची पुरी लाटून घ्या, त्यात केळ्याचा गोळा ठेवा व्यवस्थित आच्छादून घ्या. दोन्ही बाजूनी तूप सोडून सोनेरी येईपर्यंत भाजा.