जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत..

खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत साहित्य

१/४ किलो घोसाळी
५ हिरव्या मिरच्या
१ लसूण कांदा
१ वाटी कांद्याची चिरलेली पात,
१/२ छोटा चिरलेला कांदा
१/२ वाटी कुटलेले जाडसर भाजलेले शेंगदाणे
थोडे तळलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथंबीर,
मीठ, तेल

खान्देशी स्पेशल झणझणीत घोसाळ्यांचे भरीत कृती

१. प्रथम घोसाळी व कांद्याची पात स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. शेंगदाणे भाजून जाडसर कुटून घ्यावे किंवा मिक्सरला लावावे.

२. चिरलेली घोसाळी बिना पाण्याची कुकरला शिजवून घ्यावीत. मिरच्या व लसूण खलबत्यात कुटून किंवा मिक्सरला जाडसर वाटावे.

३. शिजलेली घोसाळी बडगी नसल्यामुळे लोखंडी तव्यातच स्मॅश करून घेतलेली आहेत. त्यात मिरचीचा ठेचा मिक्स करावा. फोडणीला देतेवेळी पॅन गरम करून जीरे, मोहरी फोडणीला घालावी, त्यानंतर त्यात कांदयाची पात घालावी.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा “डाळ गंडोरी” भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी

४. परतून झाल्यावर त्यात मिरचीच्या ठेच्यासहित स्मॅश केलेली घोसाळी व जाडसर कुठलेले शेंगदाणे घालावेत.

५. एक वाफ आणावी. तयार चटकदार घोसाळ्यांचे भरीतावर तळलेले शेंगदाणे, चिरलेली कोथंबीर गार्निश करून भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व्ह करावे.