Mango Custard Pudding Recipe: फळांचा राजा अशी आंबा या लोकप्रिय फळाची ओळख आहे. तोतापुरी, पायरी, हापूस आदी अनेक वेगवेगळ्या आकार, चव आणि रंगांमध्ये आंबा हा उपलब्ध असतो. फक्त आंबा खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहणारे आपल्यातील बरेच जण आहेत. मँगो लस्सी, आमरस-पुरी, आम्रखंड, मँगो केक, पेस्ट्री आदी अनेक पदार्थ आंबा या फळापासून बनवले जातात. तर आज आपण आंब्यापासून एक आगळावेगळा पदार्थ बनवणार आहोत. याचे नाव आहे ‘मँगो कस्टर्ड पुडींग’.तर आज आपण ब्रेडचा उपयोग करून ‘मँगो कस्टर्ड पुडींग’ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला पाहुयात मँगो कस्टर्ड पुडींगची सोपी रेसिपी.

साहित्य –

१. दूध – दोन कप
२. साखर- १/२ कप
३. कस्टर्ड पावडर- दोन चमचे
४. दोन पिकलेले आंबे
५. फ्रेश क्रीम – १/२ कप
६. आठ ते दहा ब्रेडचे तुकडे
७. सुका मेवा (बदाम आणि पिस्ता) – प्रत्येकी आठ ते दहा

हेही वाचा…विकतचं कशाला? तुमचं आवडतं ‘स्निकर्स चॉकलेट’ घरीच बनवा; VIDEO तून सोपी कृती पाहा…

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

१. पॅनमध्ये दूध घाला.
२. दूध थोडं उकळू लागलं की त्यात साखर घालण्यास सुरुवात करा.
३. एका भांड्यात कस्टर्ड पावडर आणि दूध घालून एक मिश्रण तयार करून घ्या.
४. उकळत्या दुधात हे मिश्रण घाला आणि दूध थोडे घट्ट होऊ द्या. नंतर पाच मिनिटे तसंच ठेवा.
५. दोन पिकलेले आंबे स्वछ धुवून, कापून घ्या व मिक्सरच्या साहाय्याने त्याचा रस काढून घ्या.
६. आंब्याचा रस पॅनमधील मिश्रणात घाला व त्याला व्यवस्थित मिक्स करा. कस्टर्डमध्ये ताजे मलई घाला, चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.
७. नंतर ब्रेड स्लाईज घ्या आणि त्यांच्या कडा कापून घ्या.
८. एका ट्रेमध्ये चार ब्रेड स्लाईज ठेवा. त्यात तयार करून घेतलेलं मिश्रणाचा एक थर चमच्याने घाला .
९. त्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्स घाला.
१०. पुन्हा मिश्रणाचा एक थर चमच्याने घाला आणि वरून ड्रायफ्रूट्स घाला.
११. तीन ते चार तास फ्रिजमध्ये ठेवा.
१२. आंब्याच्या तुकड्यांनी सजवा.
१३. अशाप्रकारे तुमचे मँगो कस्टर्ड पुडींग तयार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @khaajasimsim या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका महिलेने अगदी १५ मिनिटांत घरच्या घरी बनवली जाणारी ही सोपी रेसिपी दाखवली आहे. युजर व्हिडीओ क्रिएटर आहे. दररोज युजर नवनवीन रेसिपी तिच्या अकाउंटवर पोस्ट करीत असते. तर आज ‘मँगो कस्टर्ड पुडींग’ सोपी रेसिपी व्हिडीओत दाखवली आहे ; जी पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.