Crispy Batti Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार केलेले तुम्ही अनेक पदार्थ खाल्ले असेल पण तुम्ही कधी बट्टी नावाचा पदार्थ खाल्ला आहे का? बट्टी हा खरं तर विदर्भीय पदार्थ आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात हा आवडीने बनवला जातो. या पदार्थाला कोणी पानगे तर कोणी बिट्या सुद्धा म्हणतात. काही लोक या पदार्थाला बाटी सुद्धा म्हणतात. अनेक जणांना बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बट्टी खायला आवडतात कारण घरी कुरकुरीत बट्ट्या बनवता येत नाही, असा त्यांचा समज असतो पण तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत बट्ट्या बनवू शकता. ही बट्टी अत्यंत चविष्ठ वाटते आणि पुन्हा पुन्हा बनवून खावी असे वाटते.
सोशल मीडियावर बट्ट्यापदार्थ कसा बनवायचा, याच्या अनेक रेसिपी तुम्हाला दिसतील. अशातच एक रेसिपीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुरकुरीत बट्ट्या कसे तयार करायचे, याविषयी सांगितले आहे. (How to make Crispy Batti chack Recipe )

साहित्य –

  • १ वाटी कणीक
  • १ वाटी गव्हाची सोजी
  • तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • ओवा

हेही वाचा : घरच्या घरी, मोजक्या साहित्यात बनवा स्वादिष्ट, मऊ ‘कपकेक’; रेसिपीचा सोपा VIDEO बघा, साहित्य अन् कृती लिहून घ्या

कृती –

  • एका परातीत हीच एक वाटी कणीक आणि गव्हाची सोजी घ्या
  • त्यानंतर त्यात हळद, मीठ, तेल, तिखट आणि ओवा टाका.
  • मिश्रण एकत्र करून घट्ट गोळा करा.
  • त्यानंतर दोन पोळ्यांना गोळे लागेल तेवढा एक गोळा घ्यायचा.
  • तेल लावून गोळापासून जेवढी पातळ होईल तेवढी पोळी लाटायची.
  • व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पोळीला फोल्ड करून पॉकेट तयार करायचे आणि त्यानंतर रोल बनवायचा.
  • त्यानंतर रोल दहा मिनिटे गरम पाण्यात वाफवून घ्यायचा.
  • वाफवल्यानंतर रोलचे एकसारखे काप करायचे आणि हे काप मंद आचेवर गरम तेलातून तळून घ्यायचे.
  • अशा प्रकारे तुम्ही कुरकुरीत बट्ट्या घरच्या घरी बनवू शकता.
  • ही बट्टी तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीबरोबर खाऊ शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Prajakta Salve (@prajakta_salve_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बट्या करतानी हि टिप नक्की वापरा” प्राजक्ता साळवे या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक घरगुती टिप्स सांगत वेगवेगळे हटके व्हिडीओ शेअर करत असतात. असाच त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद. मी करणार होते आता. नवीन ट्रिक मिळाली.”