केकच्या दुकानात पेस्ट्री, केक बरोबर आवर्जून दिसणारा ‘कपकेक’ हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. केकच्या दुकानात विविध फ्लेवर्सचे छोटे-छोटे कपकेक पाहून खाण्याची प्रत्येकालाचं इच्छा होते. तुम्ही आतापर्यंत स्ट्रॉबेरी, चॉकलेट, रेड व्हेलवेट आदी अनेक प्रकारचे कपकेक खाल्ले असतील. पण, तुम्ही कधी ‘स्टीम कपकेक’ खाल्ला आहे का ? नाही… तर मोजक्या साहित्यात स्टीम कपकेक कसा बनवायचा चला पाहूया. सोशल मीडियावर एका युजरने या पदार्थाची सोपी रेसिपी दाखवली आहे. तुम्ही सुद्धा साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या.

साहित्य –

Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Authentic Maharashtrian Mokala Zunka or Korada Zunka Note The Tasty And Quick Recipe In marathi
‘मोकळा झुणका’ कधी खाल्ला आहे का? प्रवासातही बिनधास्त घेऊन जाऊ शकता; रेसिपी लगेच नोट करा
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
  • १ कप रवा , १ कप तांदळाचे पीठ, १ चमचा तूप किंवा तेल, १ कप दूध, २ चमचे दूध पावडर, इनो, किसलेलं खोबर , गूळ, मीठ.

हेही वाचा…घरच्या घरी फक्त दहा मिनीटांत करा ‘चीज ब्रेड पिझ्झा’; साहित्य अन् कृती लगेच लिहून घ्या

कृती –

  • एका बाउलमध्ये रवा, तांदळाचे पीठ, मीठ व एक कप दूध, दोन चमचे दूध पावडर घाला व मिक्स करा. नंतर इनो आणि थोडं दूध घाला आणि चांगले मिक्स करा.
  • १५ मिनिटे मिश्रण तसंच राहू द्या.
  • त्यानंतर चार ते पाच कप घ्या आणि त्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्या.
  • नंतर तयार केलेल्या मिश्रण थोडं घाला. नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा गूळ घातलेला किस टाका. नंतर पुन्हा मिश्रण घाला.
  • त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात एक प्लेट ठेवा आणि त्यात हे कप ठेवा व १० मिनिटे वाफवून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचे ‘स्टीम कपकेक’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @salivating_cuisine93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अगदी निवडक साहित्यात १५ ते २० मिनिटांत तुम्ही ‘स्टीम कपकेक’ घरी सहज बनवू शकता. हा ‘स्टीम कपकेक’ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण खाऊ शकतात. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मऊ, स्वादिष्ट ‘स्टीम कपकेक’ बनवा.