नॉनव्हेज खायला अनेकांना आवडतं. त्यात जर मासे म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. माश्यांमध्ये ओला जवळा हा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. हा चविष्ट असण्यासोबत स्वस्त देखील असतो. त्यामुळे हा सर्वसामान्य माणसांना देखील खरेदी करता येतो. ओल्या जवळ्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. वांग्याच्या भाजीत ओला जवळा घातल्याने त्याची चव अधिकच वाढते. पण आज आम्ही तुम्हाला जवळ्याची एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी खाल्ली नसेल. आम्ही बोलत आहोत ओल्या जवळ्याची भजीबद्दल. भजी खायला प्रत्येकाला आवडते. जर ही भजी ओल्या जवळ्यापासून केली तर ती खायला देखील कुरकुरीत आणि चविष्ट बनते. चला तर मग घरच्या घरी ओल्या जवळ्यापासून कुरकुरीत भजी कशी बनवायची ते जाणून घेऊया..

जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी धुतलेला जवळा
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ वाटी बेसन
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेली मिरची
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं लसूण
  • अर्धा मोठा चमचा हळद
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • मीठ चवीप्रमाणे
  • पाणी आवश्यकतेनुसार

( हे ही वाचा: वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी)

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

कृती

एक वाटी धुतलेला जवळा, त्यात एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बेसन हळद, बारीक केलेलं आलं लसूण, एक मोठा चमचा लाल तिखट गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ हे सारे मिश्रण एकत्र करून घ्या आणि मगच आवश्यकता वाटल्यास त्यात पाणी घाला. ओला जवळा असल्यामुळे फारसे पाणी लागत नाही. आता भजी करण्यासाठी या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि नेहमी भजी तळतो त्याप्रमाणे भजी तळून घ्या. अशाप्रकारे आपली ओल्या जवळ्याची भजी तयार आहे