Kadi Patta Chutney : जेवणाबरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाचा स्वाद आणखी वाढतो. त्यामुळे अनेकदा घरी जेवणाबरोबर चटणी बनवली जाते. तुम्ही कधी कढीपत्त्याची चटणी खाल्ली आहे का? कढीपत्त्याची चटणी खूप पौष्टीक आणि तितकीच स्वादिष्ट असते. जर तुम्हाला घरीच कढीपत्याची चटणी खायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा

साहित्य

  • कढीपत्ता पाने
  • तेल
  • सुकं खोबरं
  • लाल तिखट
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : Crispy Karela : कुरकुरीत कारले कशी बनवायची? या सोप्या टीप्स फॉलो करा

कृती

  • खोबरं किसून घ्यावे आणि भाजून घ्यावे.
  • कढईत तेल गरम करावे
  • मंद आचेवर तेलातून कढीपत्त्याची पाने परतून घ्यावी
  • कढीपत्ता कुरकुरीत झाला की त्यात भाजलेले खोबरे परतावे
  • हे मिश्रण थंड होवू द्यावे.
  • त्यानंतर लाल तिखट, चवीप्रमाणे साखर आणि थोडे मीठ घालावे.
  • सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करावे
  • ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता.