पावसाळा सुरू झाला की पर्यटन स्थळांवर आणि आपल्या शहरातल्या, गावातल्या भाजी मार्केटमध्ये मक्याची कणसं विकायला येतात. पावसाळा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात मक्याच्या कणसाचा आस्वाद घेता येतो. स्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्न जे असतात, ते मुळातच गोड असतात. त्यामुळे ते भाजून चटकन खाल्ले जातात. मात्र हाच मका भाजून खायला आवडत नसेल, तर त्याचा असा चवदार उपमा करून खा. नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम ठरू शकतो
मक्याचा उपमा साहित्य
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- २ वाटी मक्याचे दाणे
- २ कांदे मोठे बारीक कापलेले
- २ टेबल स्पून तेल
- चवीनुसार मीठ
- १/२ चमचा हळद दीड चमचा तिखट
- १/२ चमचा मोहरी चिमूटभर हिंग
- १ लिंबाचा रस
- १५ कढीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर धुऊन बारीक कापलेली
मक्याचा उपमा कृती
- प्रथम थोडे थोडे करून मक्याचे दाणे मिक्सरमधून सरबरीत वाटून घ्यावे.
- कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी व कढीपत्त्याची खमंग फोडणी देऊन त्यात कांदा घालून तो छान परतावा
- यामध्ये हळद तिखट मीठ घालून परतावे व वरील केलेला किस त्यामध्ये घालून छान परतावा व वाफेवर परतत शिजू द्यावा.
हेही वाचा >> सातारा, कोल्हापूर स्पेशल “घाटी” मसाला आता घरीच बनवा; १ किलोचं अचूक प्रमाण, जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
- छान खरपूस परतून शिजला की त्यावर लिंबाचा रस व कोथिंबीर पेरून गरम गरम खायला द्यावा हा उपमा अतिशय टेस्टी लागतो व पौष्टिकही आहे