Egg Sandwich Recipe: ब्रेड हा आपल्या सर्वांच्या जीवनातील असा एक पदार्थ आहे ; जो अगदी सगळ्याच पदार्थांबरोबर खाल्ला जाऊ शकतो. उदाहरणार्थ- चहाबरोबर खायचं असेल तर ब्रेड, घरी पोळी केली नसेल तर भाजीबरोबर ब्रेड, मिसळ किंवा पावभाजी बरोबर ब्रेड. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात की ब्रेड हा तुम्हाला एखाद्या दुकानात किंवा बेकरीत तर नक्कीच दिसेल. तसेच या ब्रेडचा उपयोग करून अनेक पदार्थही बनवले जातात. तर उद्या बुधवार म्हणजे तुमच्यातील अनेक नॉनव्हेज प्रेमींचा वार. तर उद्या सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला काय स्पेशल करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही काही मोजक्या साहित्यात आणि दहा ते पंधरा मिनिटांत अंड्याचे टेस्टी सँडविच तुम्ही बनवू शकता. चला साहित्य आणि कृती लिहून घ्या.

साहित्य :

१. अंडी
२. ब्रेड
३. कांदा
४. कोथिंबीर
५. मेयॉनीज
६. मिरेपूड
७. मीठ

हेही वाचा…मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं असा प्रश्न पडलाय? मग कुरकुरीत कोबीचे कटलेट बनवा; पौष्टीक रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती :

१. मध्यम आचेवर अंडी वाफवून घ्या व त्यात थोडं मीठ घाला आणि नंतर पांढऱ्या रंगाचे कव्हर काढून टाका.
२. नंतर अंडी किसणीवर किसून घ्या.
३. त्यानंतर त्यात कांदा, कोथिंबीर, मीठ, मेयॉनीज, मिरेपूड घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
४. पाच ते दहा मिनिटे हे मिश्रण असंच राहू द्या.
५. त्यानंतर ब्रेड घ्या आणि ब्रेड ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या.
६. प्रत्येक ब्रेड स्लाईसवर मेयॉनीज पसरवून घ्या.
७. तयार केलेलं मिश्रण ब्रेड स्लाईसवर पसरवून घ्या.
८. तसेच तुमच्या आवडीनुसार हे ब्रेड स्लाईस कापून घ्या.
९. अशाप्रकारे तुमचे अंड्याचे टेस्टी सँडविच तयार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेसिपी सोशल मीडियावरील @homecookingshow या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अंड्यामधील अनेक घटक हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. अंड्यापासून पटकन कोणताही पदार्थ तयार करता येणे शक्य असल्यामुळे डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. केवळ उत्तम चवीसाठीच नाही तर अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ नक्की बनवून पाहा.