आपल्याकडे खवय्यांची कमी नाही. शाकाहारी असो किंवा मांसाहारी खाण्याची आवड असणारे आणि खाद्यपदार्थातील वैविध्य शोधणारे खूप लोक असतात.भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत. मात्र मोठ्या संख्येने मांसाहारी नागरिक देखील असून चिकन, मटण आणि मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या सर्व पदार्थांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये मासा खूपच पौष्टिक असून यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मिळतात. आज अशीच एक माशाची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे ग्रील्ड फिश.चला तर मग पाहुयात ग्रील्ड फिश रेसिपी कशी करायची.

साहित्य –

अर्धा किलो सुरमई मासा

मीठ चवीनुसार

१ चमचा लिंबाचा रस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅरीनेशनसाठी साहित्य –

  • १ छोटा कांदा बारीक चिरून
  • २ चमचे आलं-लसूण पेस्ट
  • १ चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद, पाव चमचा मिक्स्ड हर्ब्स
  • पाव चमचा मिरी पावडर
  • पाव चमचा गरम मसाला
  • १ चमचा तंदुरी मसाला, २ चमचे तेल

सजावटीसाठी साहित्य –

  • लिंबाच्या फोडी, कांदा, काकडी
  • टोमॅटोच्या चकत्या

ग्रील्ड फिश कृती –

सर्व मसाला वाटून त्याची पेस्ट तयार करा. मासा धुऊन त्याचे काप करून त्याला थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा. वाटलेल्या मसाल्यात मासा मॅरीनेट करून घ्या आणि तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवा. ग्रिलिंग तव्याला थोडे तेल लावून मॅरीनेट केलेल्या माशाचे काप मंद आचेवर ग्रील करा. कांदा, टोमॅटो आणि काकडीच्या चकत्यांबरोबर गरम ग्रील्ड मासा खायला द्या.