आठवड्यातून एकदा तरी दुपारी, रात्रीच्या जेवणात तर डब्याला कोबीची भाजी ही आवर्जून असतेच. लहान मुलांनाही डब्यात कोबीची भाजी बघून खायला खूप कंटाळा करतात. म्हणून आई कधी तरी कोबीची भजी, कोबीचे पराठे बनवते. पण, तुम्ही हे सगळे पदार्थ अनेकदा खाल्ले असतील. तर आज आपण कोबीचे कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता ; जो खायला पौष्टीक व टेस्टी सुद्धा आहे. चला तर तुम्हीसुद्धा साहित्य व कृती लिहून घ्या.

साहित्य :

१. एक कप कोबी
२. १/२ कप किसलेले पनीर
३. १/२ कप किसलेले चीज (पर्यायी)
४. तीन ते चार स्मॅश केलेले बटाटे
५. कोथिंबीर
६. एक ते दोन चमचे हिरवी मिरची
७. एक चमचा मीठ
८. एक चमचा गरम मसाला
९. १/४ चमचा लाल मिरची पावडर
१०. १/४ चमचा हळद पावडर
११. एक चमचा आंबा (मँगो) पावडर
१२. १/४ कप मक्याचं पीठ
१३. तेल

हेही वाचा…Sweet Corn Paratha: मक्याचा बनवा त्रिकोणी पराठा! पौष्टिक, मसालेदार पदार्थाची रेसिपी लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. एका भांड्यात एक कप कोबी, किसलेलं चीज, पनीर, स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, आंबा (मँगो) पावडर, मक्याचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
२. त्यानंतर हाताला थोडं तेल लावा.
३. त्यानंतर मिश्रणाचे छोटे-छोटे तुमच्या आवडीनुसार गोळे किंवा आणखीन कोणत्या आकारात तुम्हाला कटलेट बनवायचे असतील तर तसंही तुम्ही बनवू शकता.
४. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा. त्यात थोडं तेल घाला आणि कोबीचे कटलेट मंद आचेवर भाजून घ्या.
५. अशाप्रकारे तुमचे ‘कोबीचे कटलेट’ तयार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodland__19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कोबीमधील व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो.कोबीमध्ये व्हिटॅमिन के देखील आहे ; जे रक्ताच्या गुठळ्या थांबवण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कोबीमधील बी जीवनसत्त्वे चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. तर अशा अनेक फायद्यांनी भरपूर कोबीपासून तुम्हीदेखील कोबीचे कटलेट बनवा आणि लहान मुलांच्या डब्यात त्यांना खायला द्या.