फणसाची भाजी ही केवळ उन्हाळ्याच्या मौसमातच केली जाते. मात्र फणसाच्या भाजीबरोबरच फणसाचा खिमादेखील बनवला जातो. अनेकजण मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाच्या भाजीचा वापर करतात. त्यामुळे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत, त्यांनादेखील फणसाचा हा चमचमीत खिमा आवडेल.

इन्स्टाग्रामवरील swantcookai नावाच्या अकाउंटने फणसाच्या खिम्याची रेसिपी शेअर केली आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी साहित्य आणि कृती काय आहे ते पाहा. रेसिपी आवडल्यास यंदाच्या उन्हाळ्यात करून पाहा.

फणसाचा खिमा

साहित्य

तेल
तूप
फणस
कांदा
टोमॅटो
मटार
कोथिंबीर
आले-लसूण पेस्ट
हिरवी मिरची
पुदिना
तमालपत्र
वेलची
काळी मिरी
जिरे पूड
धणे पूड
गरम मसाला
तिखट
पाणी

हेही वाचा :

Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

कृती

सर्वप्रथम फणस बारीक चिरून शिजवून घ्या.
आता एका कढईमध्ये तेल आणि तूप एकत्र तापवून घ्यावे.
तापलेल्या तेलामध्ये तमालपत्र,वेलची, काळी मिरी परतून घ्या.
त्यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदा गुलाबी, सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
कांद्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून, त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
आता यामध्ये हळद घालून बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटोमध्ये धणे पूड, जिरे पूड, तिखट घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून सर्व पदार्थ ढवळून घ्यावे.
आता या मिश्रणात मटार आणि शिजवलेल्या फणसाचे बारीक तुकडे घालून चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ ढवळून घ्यावे.
आवश्यकतेनुसार पाणी घालून फणसाचा खिमा व्यवस्थित शिजवून घ्या.
तयार झालेल्या खिम्यामध्ये गरम मसाला घालून तो दोन मिनिट उकळून घ्यावा. शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्या.
फणसाचा हा स्वादिष्ट आणि चमचमीत खिमा पोळी, पराठा किंवा पावाबरोबर खाऊ शकता.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @swantcookai नावाच्या अकाउंटवरून ही रेसिपी शेअर झाली आहे. या रेसिपी व्हिडिओला आत्तापर्यंत ३४.५K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.